नवी दिल्ली : उर्दू साहित्यविश्वाला मोठा धक्का बसला असून ज्येष्ठ शायर आणि गझलकार डॉ. बशीर बद्र यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे साहित्य, कला आणि संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. अनेक साहित्यिक, कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली.
डॉ. बशीर बद्र यांनी आपल्या भावस्पर्शी शायरी आणि गझलांच्या माध्यमातून उर्दू साहित्याला नवी ओळख मिळवून दिली होती. प्रेम, विरह, समाज आणि मानवी भावना यांना त्यांनी अत्यंत साध्या पण प्रभावी शब्दांत मांडले. त्यांच्या अनेक शेरांनी पिढ्यान्पिढ्या रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
उर्दू साहित्य आणि गझल क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. त्यांच्या लेखनशैलीमुळे केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील उर्दू रसिकांमध्ये त्यांना विशेष मान मिळाला होता.
डॉ. बशीर बद्र यांच्या निधनानंतर साहित्यविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक नामवंत कवी, लेखक आणि राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या कार्याची आठवण केली.
त्यांच्या जाण्याने उर्दू शायरीतील एक मोठा आवाज कायमचा शांत झाला असून साहित्यविश्वात निर्माण झालेली पोकळी भरून निघणं कठीण असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
